रावेरमधील अतिक्रमणावर चालले बुलडोझर रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास! नगरपालिका,महसूल, पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई! नागरिकांतून कारवाई चे स...
रावेरमधील अतिक्रमणावर चालले बुलडोझर रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास!
नगरपालिका,महसूल, पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई! नागरिकांतून कारवाई चे स्वागत
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर शहरातील व मुख्य महामार्गावरील वाढते अतिक्रमण व वाढलेले अपघातांचे प्रमाण सततची वाहतूक विस्कळित होऊन नेहमीची वाहतूक कोंडी तसेच पादचारी वाहन धारकांना शालेय विद्यार्थ्यांना रहदारीस होत असलेली गैरसोय या गोष्टीचा शहर वासियांना व नागरिकांना अतिशय त्रासदायक झाले होते तसेच सतत रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असल्यामुळे
रावेर च्या नगरपालिका महसूल पोलीस प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय कठोर पाऊल उचलले आहे आणि तीचा प्रशासनाच्या अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रितपणे संयुक्त अतिक्रमण मुक्त शहर ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली प्रशासनाने रावेर शहरातील शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला या अतिक्रमण विरोधी मोहिमेत रावेर रेल्वे स्टेशन रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अंकलेश्वर- बुऱ्हाणपूर महामार्गालगत शहरातील दोन्ही बाजूंवरील फूटपाथ आणि रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे हटविण्यात आली.
आणि अतिक्रमण ग्रस्त रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात झाली प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही चे नागरिकांनी स्वागत केले आणि ही कारवाई शहरातील सर्व अतिक्रमण झालेल्या संपूर्ण परिसरात करावी व शहर अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी ही नागरिकांनी केली आहे सदरची अतिक्रमण मुक्त शहर ही कारवाई व संयुक्त मोहीम रावेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील रावेर तहसीलदार दीपा जेढे आदिंच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे राबविण्यात आली.


No comments