adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद पोलिसांची धडक कारवाई; अवैध गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त, दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट

  अडावद पोलिसांची धडक कारवाई; अवैध गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त, दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट  जळगाव  प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडा...

 अडावद पोलिसांची धडक कारवाई; अवैध गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त, दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट 


जळगाव  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी शिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर अडावद पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जागेवरच नष्ट केला. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


गोपनीय माहितीच्या आधारे अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकला. या कारवाईत कैलास काशिनाथ कोळी (वय ३३, रा. इंदिरा नगर प्लॉट, अडावद, ता. चोपडा) याची अवैध दारू भट्टी उघडकीस आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी २,००० लिटर गूळ-नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन भरलेले १२ प्लास्टिक ड्रम (किंमत ₹१,४४,०००), लोखंडी पत्र्याची टाकी, लाकडी पेटती चूल व भट्टीचे साहित्य (किंमत ₹३,०००) तसेच ४० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू (किंमत ₹४,०००) असा एकूण ₹१,५१,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जागेवरच नष्ट करण्यात आला.


याप्रकरणी पोलीस अंमलदार किरण रमेश शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ), (ब), (क) व (ई) अन्वये अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.

ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली परी. पोउपनि सचिन नागरे, सफौ. जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ. किरण शिरसाठ, पोहेकॉ. शेषराव तोरे, पोहेकॉ. भरत नाईक, पोकॉ. भूषण राजेंद्र चव्हाण आणि पोकॉ. प्रदीप पाटील यांनी केली.

पोलीस प्रशासनाने अवैध दारू व्यवसाय आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा दिला आहे. 



No comments