adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुर येथून वारकऱ्यांची एसटी बस पंढरपूरकडे रवाना; अनेक भाविकांनी घेतला लाभ

 लासुर येथून वारकऱ्यांची एसटी बस पंढरपूरकडे रवाना; अनेक भाविकांनी घेतला लाभ  विश्राम तेले, चौगाव संपादक : हेमकांत गायकवाड लासुर (ता. चोपडा) ...

 लासुर येथून वारकऱ्यांची एसटी बस पंढरपूरकडे रवाना; अनेक भाविकांनी घेतला लाभ 


विश्राम तेले, चौगाव

संपादक : हेमकांत गायकवाड

लासुर (ता. चोपडा) : आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठूरायाच्या दर्शनासाठी लासुर येथून वारकऱ्यांची विशेष एसटी बस शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात रवाना झाली. चोपडा एसटी आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी "गावातून पूर्ण आसनक्षमता भरल्यास पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून देण्यात येईल व वयानुसार आवश्यक सुविधा दिल्या जातील," असे आवाहन केले होते. या आवाहनाला लासुर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गावातील माजी उपसरपंच वसंत पाटील, ह.भ.प. बापू महाराज, प्रकाश पाटील, वासुदेव सोनार आणि रमेश सोनवणे यांनी पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिकांसह पूर्ण आसनक्षमता असलेल्या प्रवाशांची नोंदणी करून बसचे आरक्षण पूर्ण केले.

या विशेष बसमुळे सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला-पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूरच्या वारीसाठी सोयीस्कर प्रवासाची संधी उपलब्ध झाली. विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये भक्तिमय वातावरण असून सर्वजण आनंदाने व उत्साहाने पंढरपूरकडे रवाना झाले.

बसचे चालक विशाल पाटील आणि वाहक अनिल पाटील यांनी प्रवाशांना आवश्यक सूचना देत सुरक्षित प्रवासासाठी मार्गदर्शन केले. यावेळी वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी पत्रकार आत्माराम पाटील, माजी सरपंच देवीलाल बाविस्कर तसेच विकास सोसायटीचे माजी चेअरमन ए. टी. माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments