adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निकृष्ट सोयाबीन बियाण्याचा फटका; भरपाई व कारवाईसाठी शिवसेनेचे कृषी विभागाला निवेदन

  निकृष्ट सोयाबीन बियाण्याचा फटका; भरपाई व कारवाईसाठी शिवसेनेचे कृषी विभागाला निवेदन  खामगाव पल्लवी पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगा...

 निकृष्ट सोयाबीन बियाण्याचा फटका; भरपाई व कारवाईसाठी शिवसेनेचे कृषी विभागाला निवेदन 


खामगाव पल्लवी पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खामगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव यांना निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई देण्याबरोबरच संबंधित बियाणे कंपनी व विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

चितोडा-अंबिकापूर येथील शेतकरी सोपान अंबादास नागे यांनी १० जून रोजी खामगाव येथील सरस्वती लाईनमधील कृषी विक्रेत्याकडून २५ किलोच्या सोयाबीनच्या पाच बॅग खरेदी केल्या होत्या. २३ जून रोजी गट क्रमांक १८३ मध्ये पेरणी केल्यानंतर अनेक ठिकाणी बियाण्याची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून खरेदी बिल व रिकाम्या बियाण्याच्या पिशव्या कृषी विभागाकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेने संबंधित शेताचा तातडीने पंचनामा करून अहवाल तयार करावा, दोषी कंपनी व विक्रेत्यावर बीज अधिनियम १९६६ अंतर्गत कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख अमोल अंधारे यांनी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

निवेदनावेळी उपजिल्हाप्रमुख गजानन धोरगे, राजेंद्र बरे, शहरप्रमुख चेतन ठोबरे, युवा सेना शहरप्रमुख राहुल कळमकर तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.

No comments