adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माजी सैनिक संघर्ष समितीच्यावतीने सेवानिवृत्त जवानाचे भव्य स्वागत !

  माजी सैनिक संघर्ष समितीच्यावतीने सेवानिवृत्त जवानाचे भव्य स्वागत ! शौकतभाई शेख/ श्रीरामपूर: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भारतीय सैन्य दलात...

 माजी सैनिक संघर्ष समितीच्यावतीने सेवानिवृत्त जवानाचे भव्य स्वागत !


शौकतभाई शेख/ श्रीरामपूर:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भारतीय सैन्य दलात २४ वर्ष प्रदीर्घ काळ देशसेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झालेले जवान माजी सैनिक हवालदार ज्ञानेश्वर शिंदे यांचे श्रीरामपूर येथील बेलापूर रेल्वे स्थानकावर माजी सैनिक समितीच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मेजर कृष्णा सरदार तसेच बेलापूर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक एम पी पांडे, विद्यांशु सिंग थाना प्रभारी बेलापूर आरपीएफ तसेच इरफान शेख मुख्य तिकीट इन्स्पेक्टर यांच्या हस्ते सेवानिवृत्त जवानास पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित नातेवाईक, गावकरी आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आणी देशभक्तीच्या घोषणांनी  हवालदार ज्ञानेश्वर शिंदे यांचे स्वागत करून त्यांनी दिलेल्या राष्ट्र सेवेबद्दल मेजर कृष्णा सरदार, रेल्वे प्रबंधक एम.पी. पांडे, आरपीएफचे पीएसआय विद्यांशु सिंग व इरफान शेख, मुख्य तिकीट इन्स्पेक्टर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 याप्रसंगी बोलतांना एम. पी. पांडे म्हणाले की, देशाच्या सिमेचे रक्षण करण्यासाठी सैनिकांनी केलेले समर्पण आणि त्याग हा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे, सेवानिवृत्ती नंतरही त्यांचा अनुभव समाजहिताच्या कार्यात मोठा प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व त्यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर सेवा निवृत्त जवान व समितीचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व नातेवाईकांनी शहरातील शहीद स्मारकास पुष्प चक्र अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी माजी सैनिक संघर्ष समितीचे मेजर कृष्णा सरदार, तालुका अध्यक्ष बाळासाहेब भागडे, मेजर संग्राम यादव ,मेजर अशोक कायगुडे, मेजर संदीप यादव ,नंदकुमार सिनारे, संजय शिनारे ,प्रवीण सिनारे ,अक्षय सिनारे ,उत्तम उबाळे, संदीप शिंदे ,जयवंत भेर, शरद भांड ,सुरज कोठुळे, अमोल कोते, दादासाहेब उबाळे आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वृत्त विशेष सहयोग

मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments