adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी.. जिजाऊ ब्रिगेडची राजीनाम्याची मागणी.

पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी.. जिजाऊ ब्रिगेडची राजीनाम्याची मागणी.   लातूर,जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:-...

पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी..

जिजाऊ ब्रिगेडची राजीनाम्याची मागणी. 


 लातूर,जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

देशभरात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने समोर येत असलेल्या कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून, या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड, निलंगा यांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात तालुकाध्यक्ष सुनिता सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले असून, त्या आंदोलनाला जिजाऊ ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, NEET, TET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्रात पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा प्रणाली निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, तसेच पेपरफुटीच्या घटनांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, दिल्लीतील आंदोलनकर्त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून, केंद्र सरकारने या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन संवादाद्वारे प्रश्न मार्गी लावावेत आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सुनिता सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष छाया बिरादार, तालुका सचिव रेखा ज्ञानेश्वर तोटाळे, मनीषा बालाजी भोपी, सुलक्षणा तानाजी भोपी, ऐश्वर्या धुमाळ, आशा सरवदे, सविता आर्य, सुलोचना कांबळे, शिवकन्या बिराजदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments