adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वर्डी वि का सोच्या चेअरमनपदी प्रदिप शिंदे यांची बिनविरोध निवड विकासोत प्रथमच मराठा समाजाला नेतृत्वाची संधी

 वर्डी वि का सोच्या चेअरमनपदी प्रदिप शिंदे यांची बिनविरोध निवड  विकासोत प्रथमच मराठा समाजाला नेतृत्वाची संधी  वर्डी ता. चोपडा प्रतिनिधी (संप...

 वर्डी वि का सोच्या चेअरमनपदी प्रदिप शिंदे यांची बिनविरोध निवड 

विकासोत प्रथमच मराठा समाजाला नेतृत्वाची संधी 


वर्डी ता. चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वर्डी ता चोपडा :-  येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दिपक चंपालाल पाटील यांनी मौखिक करारानुसार ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी दिनांक २० जुलै रोजी चेअरमनपदा साठी निवडणुक घेण्यात आली.यात चेअरमनपदासाठी प्रदिप शिवाजी शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणुक निर्णय अधिकारी डि आर पुरोहित यांनी बिनविरोध चेअरमन पदासाठी घोषीत केले. चेअरमन प्रदिप शिंदे यांना सुचक दिपक पाटील तर अनुमोदन रविंद्र रघुनाथ धनगर झाले होते.यावेळी सदस्य आधार साळुंखे, धर्मराज पाटील, प्रविण पाटील, राजेंद्र नायदे,मुनाफ पिंजारी, दिलीप काशिनाथ पाटील, भगवान नायदे, शाम नायदे उपस्थित होते.निवडणुक कामकाजी सचिव विनोद पाटील लिपिक सदानंद पाटील,अमोल पाटील सहकार्य केले.नवनियुक्त चेअरमन प्रदिप शिंदे यांचे माजी जि प सदस्य बाळासाहेब पाटील मार्केट कमिटी चे उपसभापती विनायकराव चव्हाण,माजी सभापती कांतीलाल पाटील गजानन पाटील सह संचालक मंडळाने अभिनंदन केले.तर सन १९१४ सांगली स्थापन झालेल्या या विविध कार्यकारी सहकारी संस्थेत प्रथमच मराठा समाजाला नेतृत्वाची संधी मिळाल्याने समाजातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

No comments