adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

​स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! मिरजगाव अन् राहुरीत अवैध वाळू वाहतुकीवर धाड;२० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

 ​स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! मिरजगाव अन् राहुरीत अवैध वाळू वाहतुकीवर धाड;२० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त  सचिन मोकळं अहिल्यानगर (स...

 ​स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! मिरजगाव अन् राहुरीत अवैध वाळू वाहतुकीवर धाड;२० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर:- जिल्ह्यातील अवैध धंदे आणि वाळूच्या बेकायदेशीर उपसा व वाहतुकी विरोधात अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेतला आहे.स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मिरजगाव आणि राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर आणि टेम्पो जप्त केले आहेत.या कारवाईत दोन आरोपींना गजाआड करण्यात आले असून,एकूण २० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.या आदेशांची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी लागलीच नियोजनबद्ध रणनीती आखली.​त्यांनी पोलीस अंमलदार गणेश लोंढे,गणेश धोत्रे,अशोक लिपणे, बाळासाहेब गुंजाळ,रोहित मिसाळ,बाळासाहेब नागरगोजे,विजय ठोंबरे, सोमनाथ झांबरे व रणजीत जाधव अशा अनुभवी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली दोन विशेष पथके तयार करून वेगवेगळ्या भागात रवाना केली.​३० जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गुप्त बातमीदारांमार्फत मिरजगाव आणि राहुरी परिसरात अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची पक्की माहिती मिळाली.पोलिसांनी वेळ न दवडता पंचांसमक्ष दोन्ही ठिकाणी अचानक छापे टाकले.या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले.

No comments