adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री एकविरा माता अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पातरखेडा येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी....

 श्री एकविरा माता अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पातरखेडा येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी....  एरंडोल प्रतिनिधी (संप...

 श्री एकविरा माता अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पातरखेडा येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी.... 


एरंडोल प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल :- तालुक्यातील पातरखेडा येथील  श्री एकविरा माता अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पाथरखेडा या विद्यालयात आज गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत मोठ्या  उत्साहात आणि आनंदाने साजरी करण्यात  आली

      कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दिप प्रज्वलन आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शिक्षक  प्रताप पाटील सर तसेच प्रमुख अतिथी सुरेश मराठे  उपस्थित होते. सर्व गुरुजनांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  युवराज चौधरी  यांनी केले विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरूंचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्यातील त्यांचे स्थान यावर सुंदर विचार मांडले व काहींनी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करत गाणी व भाषणे सादर केले. तसेच  आबा पाटील व  संजय बागडे सर यांनी गुरुची महिमा सांगून अनमोल मार्गदर्शन केले व अध्यक्षांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना जीवनात शिक्षकांचे व संस्कृतीचे मोल समजावून सांगितले तसेच महर्षी व्यासांबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद   उपस्थित होते व सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले, या कार्यक्रमाचे आभार  मनोहर पाटील यांनी केले या सुंदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

No comments