adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; मध्यप्रदेशातील तिघा घरफोड्यांना अटक, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; मध्यप्रदेशातील तिघा घरफोड्यांना अटक, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त  मुक्ताईनगर  प्रतिनिधी : (संपादक -:- हे...

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; मध्यप्रदेशातील तिघा घरफोड्यांना अटक, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त 


मुक्ताईनगर  प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत मध्यप्रदेशातील तिघा सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

फिर्यादी प्रदीपकुमार मधुकर चौधरी (वय ६३, रा. शिवकॉलनी, मुक्ताईनगर) यांनी त्यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यप्रदेशातील मनोजसिंग जीवनसिंग बरणाला (रा. उमरटी पोस्ट बलवाडी, जि. बडवानी), प्रतापसिंग इंद्रसिंग बरणाला (रा. पनवा, जि. धार) व तुफानसिंग तिरसिंग बडोले (रा. झुलकिया, जि. खरगोन) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी मुक्ताईनगर परिसरातील अनेक घरफोड्यांची कबुली दिली.

तपासात खालील गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून संबंधित गुन्ह्यांमधील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल :

१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र

३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या

२० मणी असलेले सोन्याचे दागिने

दोन तोरड्या व एक सोन्याची अंगठी

चांदीचे कडे

२५,००० रुपये रोख

घरफोडीसाठी वापरण्यात येणारे स्क्रू ड्रायव्हर, पाना, वाकळलेली टोमी व इतर साहित्य

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत : ८,७६,५०० रुपये.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोहेकॉ. महेंद्र सुरवाडे, राकेश चव्हाण, असीम तडवी, कल्पेश आमलेकर, रविंद्र धनगर, सुनील मोरे, तिरथ चव्हाण, राजेंद्र पवार आणि राजेश वाघ आदींचा सहभाग होता.

पोलिसांनी अटक आरोपींकडून आणखी काही घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली असून पुढील तपास पो.हे.कॉ राजेश चव्हाण करीत आहे

No comments