adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सिंधूताई सपकाळ निराधार आश्रमास फैजपूर वाशीय कडून आर्थिक मदत्; यापुढेही सहकार्य सुरु राहणार नरेंद्रभाऊ नारखेडे

 सिंधूताई सपकाळ निराधार आश्रमास फैजपूर वाशीय कडून आर्थिक मदत्;  यापुढेही सहकार्य सुरु राहणार नरेंद्रभाऊ नारखेडे  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक...

 सिंधूताई सपकाळ निराधार आश्रमास फैजपूर वाशीय कडून आर्थिक मदत्;  यापुढेही सहकार्य सुरु राहणार नरेंद्रभाऊ नारखेडे 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर सिंधुताई सपकाळ यांनी निराधार बालकांचे संगोपन करण्याचे कार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले  गत काळात हजारो निराधार मुलांना संगोपन करून आईचे निस्वार्थ प्रेम दिले आहे यापुढेही हे कार्य जोमाने सुरू असून संस्थेचा विस्तार झाल्याने पुणे जवळ शिरूर येथे नवीन 7 मजली इमातीचे बांधकाम सुरू आहे या बांधकाम करिता फैजपूर शहरातील सातपुडा सहकारी पतसंस्था व लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांचे वतीने एक लाख रुपये व जितेंद्र इंगळे यांचे 25 हजार अशी रक्कम देणगी संस्था अध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी कार्यस्थळी जाऊन प्रदान केली हे बांधकाम साठी कोट्यवधी रुपये लागणार असून देणगीदार यांनी या सामाजिक कार्यास आपली देणगी देऊन हातभार लावावा असे आवाहन सहकार भारती जिल्हा अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी केले आहे  


सिंधूताई सपकाळ यांचे पूर्व आयुष्य फैजपूर शहरात झालेले असल्याने एक गावकरी यांचा ऋणानुबंध जोडलेला आहे म्हणून सिंधूताई यांचे सामाजिक कार्यास  शहरातून कायम आर्थिक मदत केली जाते यापुढेही ही मदत सुरू राहणार असल्याचे ग्वाही शहरवासीयां तर्फे नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी सांगितले शिरूर येथील बालक आश्रमात नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी सहकारी यांचे समवेत भेट दिली तेथील मुलांशी हितगुज केले सुरु असलेल्या बांधकामाची माहिती विनय सपकाळ यांनी उपस्थिताना दिली निधीची आवश्यकता व अडीअडचणी यावर सविस्तर चर्चा झाली। यावेळी सिव्हिल इंजिनिअर भरत महाजन अतुल तळेले  संजोग होले हरीश अत्तरदे धवल तलेले आश्रम सेवक विनय सपकाळे व ममता ताई सपकाळ यांचेशी चर्चा होऊन सुरू असलेले बांधकाम जन सहभागातून लवकरच पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला याकरिता सातपुडा सोसायटी व लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक मंडळ यांचे मोठे सहकार्य लाभले

No comments