adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गलंगी जि.प. शाळेत ५८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वितरण; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

गलंगी जि.प. शाळेत ५८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वितरण; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण  गलंगी, ता. चोपडा : मच्छिंद्र रायसिंग (संपादक ...

गलंगी जि.प. शाळेत ५८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वितरण; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण 


गलंगी, ता. चोपडा : मच्छिंद्र रायसिंग

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गलंगी येथे शासनाच्या मोफत गणवेश वाटप योजनेअंतर्गत शाळेतील ५८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वितरण करण्यात आले. नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी सरपंच शितल देवराज, उपसरपंच रंगराव देवराज, ग्रामपंचायत सदस्य गोपाल देवराज, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम बाविस्कर, मुख्याध्यापक रवींद्र नानाभाऊ ठाकरे, शिक्षक सचिन पाटील, कल्पना साळुंखे तसेच गावातील पालकवर्ग उपस्थित होता. यावेळी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाबरोबरच शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ मिळत असल्याचे सांगण्यात आले. शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन केले. नवीन गणवेश परिधान करताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

No comments