एम.एम. नारखेडे विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एम....
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एम.एम. नारखेडे विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. वाय. सोनवणे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपशिक्षक व्ही. डी. तायडे, सौ. योगिता झांबरे, बबिता तडवी, के. एल. भंगाळे तसेच उपस्थित शिक्षकांनीही प्रतिमेस अभिवादन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक आर. वाय. सोनवणे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान व राष्ट्रसेवा आपण सदैव स्मरणात ठेवली पाहिजे," असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन साखरे यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments