शिक्षण हे मानवी जीवनातील संपत्ती जे टी महाजन पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रदीप राणे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिक्ष...
शिक्षण हे मानवी जीवनातील संपत्ती जे टी महाजन पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रदीप राणे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिक्षण ही मानवी जीवनाची संपत्ती असून ती प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जे टी महाजन पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रदीप राणे यांनी केले ते लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मार्फत गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिनेट सदस्य तथा संस्था अध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे होते फैजपूर शहरातील गरीब व निराधार विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था तर्फे मोफत शालेय साहित्य वाटप केले जाते या सामाजिक उपक्रमा अंतर्गत हा कार्यक्रम म्युनिसिपल हायस्कूल येथे सम्पन्न झाला.
अध्यक्षीय मनोगतात नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी आवाहन केले कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य प्रदीप राणे चेअरमन नरेंद्रभाऊ नारखेडे व्हा चेअरमन मनोजकुमार पाटील संचालक अनिल नारखेडे सुरेश परदेशी मुख्याध्यापक के टी तलेले भास्कर बोडे अप्पा चौधरी यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तर वह्या कंपास पेटी वाटप करण्यात आले कार्यक्रमास पर्यवेक्षक एस ओ सराफ व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक एन पी पाटील यांनी केले सूत्र संचालन श्रीमती ललिता पाटील यांनी केले ए टी महाजन व्ही एम भोईर ,व्यवस्थापक महेंद्र वायकोळे व राजेंद्र मिस्त्री राजेंद्र मानेकर यांनी परिश्रम घेतले आभार हेमांगी कोल्हे यांनी मानले


No comments