adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बुलढाणा जिल्ह्यात 'अहिल्या संदेश यात्रा'चे आयोजन; नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न

 बुलढाणा जिल्ह्यात 'अहिल्या संदेश यात्रा'चे आयोजन; नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न  खामगाव  : पल्लवी पाटील (संपादक -:...

 बुलढाणा जिल्ह्यात 'अहिल्या संदेश यात्रा'चे आयोजन; नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न 


खामगाव  : पल्लवी पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज महासंघ, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाभर 'अहिल्या संदेश यात्रा' आयोजित करण्यात येणार असून, या यात्रेच्या नियोजनासाठी शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी खामगाव येथे मा. शरदभाऊ वसतकार यांच्या कार्यालयात जिल्हास्तरीय नियोजन बैठक उत्साहात पार पडली.

धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेब डांगे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष मा. शत्रुघनभाऊ पाचपोर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. आगामी ३ ऑगस्ट रोजी यात्रेचा शुभारंभ निंबा माता शक्तीपीठ, निंबोळा (ता. नांदुरा) येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असून, यात्रा नांदुरा, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव या सात तालुक्यांतील गावागावांतून प्रवास करणार आहे. यात्रेचा समारोप ९ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथे होणार आहे.

बैठकीत मा. श्रीरामभाऊ पुंडे (माजी प्रदेशाध्यक्ष), मा. शरदभाऊ वसतकार (प्रदेश उपाध्यक्ष), मा. मनोहरभाऊ पाचपोर (माजी जिल्हाध्यक्ष) तसेच मा. शत्रुघनभाऊ पाचपोर (जिल्हाध्यक्ष, धनगर समाज महासंघ) यांनी मार्गदर्शन केले. यात्रेचा मार्ग, वेळापत्रक, नाश्ता, जेवण, मुक्काम तसेच गावनिहाय नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यात्रेच्या माध्यमातून लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा प्रचार-प्रसार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हा मुख्य उद्देश असून, त्यासाठी मार्गनियोजन व कार्यक्रमाचे वेळापत्रक असलेली माहितीपत्रके (पॅम्प्लेट) गावागावांतील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

या बैठकीस विलास तितरे (नांदुरा), नंदकिशोर पुंडे (संग्रामपूर), अशोक भिवटे (जळगाव जामोद), अंबादास भिवटे (शेगाव), कृष्णकांत सुशीर (मलकापूर), प्रल्हादजी पातोंडा (खामगाव), रवींद्रजी गुरव महाराज, निलेशजी साबे, अनिलजी पाचपोळ, विजय वसतकार, अशोकजी करे, विठ्ठल सुशीर, दगडूभाऊ खोंदले, जनार्दन वरखेडे, श्रीकृष्ण साबे, ज्ञानेश्वर घोंगे, निलेश सोनवणे, गणेश सुशीर, अंबादास माने, गुरवभाऊ अटाळी यांच्यासह धनगर समाज महासंघाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला असून, आगामी अहिल्या संदेश यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments