adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखिल चोपडा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

 अखिल चोपडा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड  चोपडा | प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 अखिल चोपडा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड 


चोपडा | प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अखिल चोपडा प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन व नवीन कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रम रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मुकुंदराव सोनवणे हे होते.

याप्रसंगी अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस देवेंद्र भास्करराव पाटील, महिला जिल्हाध्यक्षा ज्योतिताई राणे तसेच चोपडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अजितदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास अखिल यावल प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत मोटे, अखिल एरंडोल प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील, अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विजय देवरे, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, तसेच अखिल यावल प्राथमिक शिक्षक संघाचे आरिफ तडवी, सुरुंग बारेला, दीपक चव्हाण व अर्चना विसावे यांच्यासह अनेक शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

यावेळी अखिल चोपडा प्राथमिक शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामध्ये तालुकाध्यक्षपदी अनिल पाटील, सरचिटणीसपदी विलास पाटील, कार्याध्यक्षपदी दिगंबर सोनवणे, कोषाध्यक्षपदी समाधान पाटील तसेच कार्यालयीन चिटणीस (स्थायी) पदावर रोहिदास विसावे यांची यथोचित निवड करण्यात आली.

तसेच अखिल चोपडा महिला प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. त्यामध्ये तालुकाध्यक्षा रेखाताई पाटील, सरचिटणीस मिनाक्षीताई पाटील, कार्याध्यक्षा मनिषाताई पाटील व सोनालीताई महाले, कोषाध्यक्षा प्रतिभाताई पाटील व शितलताई जाधव, तर कार्यालयीन चिटणीस (स्थायी) पदावर प्रियंकाताई निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय व सेवाविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments