भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी संतोष मेढे यांची निवड इदू पिंजारी फैजपुर (संपादक हेमकांत गायकवाड) फैजपूर भारतीय जनता प...
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी संतोष मेढे यांची निवड
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक हेमकांत गायकवाड)
फैजपूर भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीत फैजपूर येथील संतोष मनिराम मेढे यांची 'जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजप जळगाव जिल्हा (पूर्व) जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांनी ११ जुलै २०२६ रोजी ही अनुसूचित जाती मोर्चाची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली ही नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
या जाहीर झालेल्या यादीत फैजपूर येथील रहिवासी असलेल्या संतोष मनिराम मेढे यांच्यावर कोषाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आणि निवडीबद्दल शहर व परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments