adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली जिल्हा परिषद केंद्र शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

अंतुर्ली जिल्हा परिषद केंद्र शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न अंतुर्ली ता. मुक्ताईनगर  : किरण धायले (संपादक -:- हेमकांत...

अंतुर्ली जिल्हा परिषद केंद्र शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न


अंतुर्ली ता. मुक्ताईनगर  : किरण धायले

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. रूपाली पाटील, उपाध्यक्ष शेषराव कोसोदे, अंतुर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख विजय गोसावी, ग्रेडेड मुख्याध्यापिका प्रेमलता कोसोदे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बैलगाडी व पालखी आकर्षकपणे सजवून गावातून दिंडी काढण्यात आली. श्री. जितेंद्र महाजन यांनी स्वतःची बैलजोडी दिंडीसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रप्रमुख विजय गोसावी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

दिंडीदरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटांचा प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच गावातील भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन पूजन केले. श्री. शरद महाजन यांनी विद्यार्थ्यांना केळी, तर देविदास जगन्नाथ चौधरी यांनी चॉकलेट व खाऊचे वाटप करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने केंद्रप्रमुख विजय गोसावी व ग्रेडेड मुख्याध्यापिका प्रेमलता कोसोदे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका प्रेमलता कोसोदे, उपशिक्षक चंद्रकांत विश्वासराव पाटील, युवराज शिंदे, धर्मा कोळी, वसीम मसूलदार, अजय रामटेके, नितीन गायकवाड, लक्ष्मी तांबे, प्रतिमा चौधरी आणि सारिका भांडवलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या दिंडी सोहळ्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

No comments