अंधरमळी जि.प. शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; फैजान तडवी प्रथम रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक...
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंधरमळी येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. फैजान फिरोज तडवी याने २३२ गुणांसह प्रथम, आवेश आरिफ तडवी (२०२) द्वितीय, साबीर मुस्तफा तडवी (१९८) तृतीय, आलिया अरमान तडवी (१९६) चतुर्थ आणि शहादत गुलशेर तडवी (१७६) यांनी पाचवा क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments