adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करा! राकेश सोनार जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, रावेर लोकसभा यांचे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना जळगाव येथे निवेदन

बालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करा! राकेश सोनार जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, रावेर लोकसभा य...

बालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करा!

राकेश सोनार जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, रावेर लोकसभा यांचे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना जळगाव येथे निवेदन 

महिला व बालविकास मंत्री आदीती ताई तटकरे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार

भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यातील 'बालसंगोपन योजना' अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरीत करण्यात यावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात यावेत, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, रावेर लोकसभा चे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदितीताई तटकरे यांना जळगाव येथे प्रत्यक्ष भेटून दिले.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ, निराधार आणि गरजू बालकांच्या संगोपनासाठी 'बालसंगोपन योजना' राबवली जाते. ही योजना बालकांसाठी अत्यंत दिलासादायक असली तरी, जळगाव जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा नियमित लाभ मिळालेला नाही, अशी गंभीर बाब राकेश सोनार यांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

लाभ वेळेवर न मिळाल्यामुळे या चिमुकल्यांचे शिक्षण, आरोग्य आणि संगोपनावर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. तसेच हातावर पोट असलेल्या गरजू पालकांना व नातेवाईकांना लाभाच्या आशेने शासकीय कार्यालयांचे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्ह्यातील अनेक पात्र आणि गरजू बालके आपल्या हक्काच्या लाभापासून वंचित राहत आहेत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या:

१. जळगाव जिल्ह्यातील बालसंगोपन योजनेचा मागील ३ वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरित करण्यात यावा.

२. पात्र लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे लाभ मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेला सख्त सूचना देण्यात याव्यात.

३. लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांत होणारा नाहक त्रास थांबवून ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात यावी.

या गंभीर प्रश्नात महिला व बालविकास मंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी तातडीने लक्ष घालून जळगाव जिल्ह्यातील पात्र बालकांना व त्यांच्या पालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी राकेश सोनार यांनी केली आहे. मंत्री महोदयांनी या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांना दिले आहे.

No comments