महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या,रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या,रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष सन्मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनविसे सरचिटणीस मा.श्री. संदीप दादा पाचंगे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे उत्साहात पार पडली.
नुकत्याच मुंबई (दादर) येथे सन्मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा आढावा यावेळी घेण्यात आला. विशेषतः दि. १ ऑगस्ट रोजी दादर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याचे नियोजन तसेच त्याच दिवशी सुरू होणाऱ्या विद्यार्थी सदस्य नोंदणी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करून विविध जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्या.
यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, मनविसे जिल्हा सचिव विष्णू कोळी, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रणय भागवत, चोपडा तालुका संघटक चेतन पवार, तालुका उपाध्यक्ष नितीन कोळी, भुसावळ शहराध्यक्ष वैभव सुरवाडे, चैतन्य महाजन, किशोर खडके तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रम, विद्यार्थी प्रश्नांवरील आंदोलनाची दिशा, सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविणे तसेच वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला

No comments