adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तुमचा एक फोन वाचवू शकतो एका निरागस बालकाचे आयुष्य 'स्नेहालय मुक्ती वाहिनी' आणि शहर डीवायएसपी टिपरसे यांच्या सहकार्याने पोलिसांची शहरातील संकटग्रस्त मुलांसाठी मोठी मोहीम!

  तुमचा एक फोन वाचवू शकतो एका निरागस बालकाचे आयुष्य 'स्नेहालय मुक्ती वाहिनी' आणि शहर डीवायएसपी टिपरसे यांच्या सहकार्याने  पोलिसांची ...

 तुमचा एक फोन वाचवू शकतो एका निरागस बालकाचे आयुष्य 'स्नेहालय मुक्ती वाहिनी' आणि शहर डीवायएसपी टिपरसे यांच्या सहकार्याने  पोलिसांची शहरातील संकटग्रस्त मुलांसाठी मोठी मोहीम! 



सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- शहरात मध्यरात्री एक मोठी मोहीम राबवण्यात आली, ज्याची माहिती समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.उपविभागीय पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि 'स्नेहालय' संचलित उडान प्रकल्प,मुक्ती वाहिनी आणि स्नेह बाल आधार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात व्यापक 'नाईट पेट्रोलिंग' करण्यात आली.ही मोहीम संकटग्रस्त,बेवारस,हरवलेली, बालमजुरी,बालभिक्षा, बालविवाह अथवा अन्य प्रकारच्या शोषणाला बळी पडणाऱ्या बालकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने संरक्षण व पुनर्वसन मिळवून देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली.
​स्नेहालय संस्था गेल्या ३८ वर्षांपासून समाजातील विविध ज्वलंत आणि संवेदनशील समस्यांवर सातत्याने कार्यरत असून,बालसंरक्षणाच्या क्षेत्रात या संस्थेने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.संस्थेची 'मुक्ती वाहिनी' ही २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी सज्ज असते,हे या मोहिमेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले.एका जागरूक नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार,आजवर या पथकाने २१८ संकटग्रस्त बालकांना विविध प्रकारच्या शोषण,बालमजुरी,बालभिक्षा, बालविवाह,बेवारस अवस्था आणि इतर धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढून त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यात यश मिळवले आहे.
​या विशेष नाईट पेट्रोलिंग दरम्यान शहरातील जवळपास सर्वच प्रमुख आणि संवेदनशील ठिकाणांना भेटी देण्यात आल्या.यात चितळे रोड,दिल्लीगेट,सिद्धीबाग, जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर,पत्रकार चौक,प्रोफेसर चौक,तोफखाना पोलीस ठाणे, सिद्धी कॉलनी,तारकपूर बसस्थानक,डीएसपी चौक, कोठला स्टँड,स्वस्तिक चौक, पुणे बसस्थानक,सक्कर चौक, टिळक रोड,कोतवाली पोलीस ठाणे,कापड बाजार,रेल्वे स्थानक,माळीवाडा,वाडिया पार्क,एमआयडीसी परिसर अशा विविध भागांचा समावेश होता.यासोबतच शहरातील विविध पोलीस ठाणे व रेल्वे पोलीस ठाण्यांनाही पथकाने भेटी देऊन समन्वय साधला.
​पेट्रोलिंग दरम्यान केवळ फेरफटका मारण्यात आला नाही,तर मध्यरात्री शहराच्या सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या विविध घटकांशी संवाद साधून त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले.यात चहा विक्रेते,पानटपरी चालक,रिक्षा व टॅक्सी चालक,सुरक्षा रक्षक, फेरीवाले तसेच रात्री काम करणाऱ्या इतर लोकांचा समावेश होता.या सर्वांना आवाहन करण्यात आले की, त्यांना कोणतीही संकटग्रस्त किंवा संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास तात्काळ मुक्ती वाहिनीला माहिती द्यावी. "समाजातील हे सर्व घटक बालसंरक्षण मोहिमेतील महत्त्वाचे स्वयंसेवक आहेत, त्यांच्या एका जागरूक फोनमुळे एका निरागस बालकाचे आयुष्य बदलू शकते," असे या प्रसंगी अधोरेखित करण्यात आले.
​नाईट पेट्रोलिंग दरम्यान एखादे बालक बेवारस किंवा संकटग्रस्त अवस्थेत आढळल्यास,पोलीस विभागाच्या समन्वयातून त्याला तातडीने संरक्षण दिले जाते.त्यानंतर पुढील कायदेशीर आणि पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात येते.या संपूर्ण उपक्रमासाठी उपविभागीय पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे व पोलीस यंत्रणेचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती स्नेहालयच्या वतीने देण्यात आली.या मोहिमेचे संपूर्ण नियोजन व संचालन प्रवीण कदम,शाहिद शेख,आवेज हबीब तसेच उडान प्रकल्प, मुक्ती वाहिनी आणि स्नेह बाल आधार यांच्या संपूर्ण पथकाने अत्यंत कौशल्याने केले.
​यावेळी स्नेहालयच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.आपल्या परिसरात कोणतेही बालक बेवारस,हरवलेले,बालमजुरी, बालभिक्षा,बालविवाह किंवा अन्य कोणत्याही संकटग्रस्त अवस्थेत आढळल्यास, तात्काळ खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा:
​स्नेहालय मुक्ती वाहिनी: 9011098008
​उडान हेल्पलाइन: 9011026495
​चाइल्ड हेल्पलाईन: १०९८
​पोलीस हेल्पलाईन: ११२
​प्रत्येक जागरूक नागरिकाचा एक फोन एका निरागस बालकाचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि सुखी करू शकतो.आपल्या सभोवताली घडणाऱ्या अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता, प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे.

No comments