adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विशेष पुनर्परीक्षण मोहिमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विचखेडा येथे २२५ ईएफ फॉर्म भरले एस.आय.आर. विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन; मंडळाधिकारी सुरेश पाटील यांची भेट

विशेष पुनर्परीक्षण मोहिमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विचखेडा येथे २२५ ईएफ फॉर्म भरले एस.आय.आर. विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमांतर्गत व...

विशेष पुनर्परीक्षण मोहिमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विचखेडा येथे २२५ ईएफ फॉर्म भरले


एस.आय.आर. विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन; मंडळाधिकारी सुरेश पाटील यांची भेट 


चंद्रकांत पाटील विचखेडा 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)


दि. ७ जुलै २०२६ रोजी एस.आय.आर. (Special Intensive Revision) विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमांतर्गत मौजे विचखेडा येथे मतदारांचे ईएफ (EF) फॉर्म भरण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराला मंडळाधिकारी श्री. सुरेश पाटील (चहार्डी मंडळ) यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत श्री. संदीप सूर्यवंशी उपस्थित होते. दोघांनीही मतदारांना विशेष पुनर्परीक्षण मोहिमेचे महत्त्व, ईएफ फॉर्म भरण्याची प्रक्रिया तसेच मतदार यादी अद्ययावत ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी गावाचे प्रथम नागरिक तथा लोकनियुक्त सरपंच श्री. रवींद्र (बापूसाहेब) बाळकृष्ण पाटील, उपसरपंच श्री. नंदू आबा तसेच तापी सूतगिरणीचे संचालक श्री. चंद्रकांत (दादासो) गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

बूथ क्रमांक २५९ विचखेडा येथील बीएलओ श्री. तुषार भगवान पवार यांनी शिबिराचे नियोजन करून मतदारांकडून ईएफ फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. त्यांना अंगणवाडी सेविका श्रीमती मीनाताई बोरसे, अंगणवाडी मदतनीस श्रीमती अनिताताई शिरसाट, पोलीस पाटील आनंदा शिरसाट, कोतवाल गौतम शिरसाट, आशा सेविका प्रियंका धनगर तसेच ग्रामस्थ राजमल बोरसे, बापू शिरसाट, सुनील धनगर आणि सोपान पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दिवसभर चाललेल्या या विशेष शिबिरात एकूण २२५ मतदारांचे ईएफ फॉर्म भरून घेण्यात आले, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

No comments