adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोकसेवक स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण; मान्यवरांच्या उपस्थितीत कार्याला अभिवादन माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते अनावरण; हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

 लोकसेवक स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण; मान्यवरांच्या उपस्थितीत कार्याला अभिवादन माजी सरन्यायाधीश भूषण गवई य...

 लोकसेवक स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण; मान्यवरांच्या उपस्थितीत कार्याला अभिवादन

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते अनावरण; हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती 


मुक्ताईनगर / जळगाव, प्रतिनिधी – किरण धायले

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, जळगाव येथे लोकसेवक स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा सोहळा आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्राचे माजी सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहितवादी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित करत शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, माजी कुलगुरू के. बी. पाटील, माजी प्रभारी कुलगुरू प्रा. शिवाजीराव पाटील, माजी कुलगुरू प्रा. एन. के. ठाकरे, माजी कुलगुरू प्रा. आर. एस. माळी, माजी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची विशेष उपस्थिती लाभली.

याशिवाय विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून उपस्थितांनी लोकसेवक स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन केले.

No comments