तहसीलदार डी.पी. सपकाळे यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन. अरुण धनगर जळगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) डी.पी.सपकाळ...
तहसीलदार डी.पी. सपकाळे यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
अरुण धनगर जळगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डी.पी.सपकाळे बोदवड तहसीलदार हे कर्तव्यावर २७ जुलै रोजी त्याचेवर वाळू माफियानी केलेला भ्याड हल्ल्यामुळे जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) जळगाव यांना निवेदन देऊन दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी.यासाठी जळगांव कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संलग्न सर्व शाखांच्या वतीने निवेदन देतांना.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे,महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल,कोषागार विभागाचे तथा कास्ट्राईब चे सहसीचव रवींद्र गायकवाड,कास्ट्राईब मनपाचे कार्याध्यक्ष नंदू गायकवाड,कृषी विभागाचे किशोर महिराळे,महसूल विभागाचे महेश सपकाळे,संदीप खैरे,भिमराव देसले,कास्ट्राईब जलसंपदा विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे,सचिव जिभाऊ हटकर,विक्की गोंधळी,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर साळुंखे,कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे एस.डी.बनगे,कृष्णा चव्हाण आदी विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते .

No comments