adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ. उल्हास पाटील स्कूल मधील स्तोत्रा कोरे हिचे घवघवीत यश

 डॉ. उल्हास पाटील स्कूल मधील स्तोत्रा कोरे हिचे घवघवीत यश   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   सावदा येथील डॉ. उल्ह...

 डॉ. उल्हास पाटील स्कूल मधील स्तोत्रा कोरे हिचे घवघवीत यश  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सावदा येथील डॉ. उल्हास पाटील सी.बी.एस.ई. स्कूलच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.

इयत्ता सातवीची विद्यार्थिनी स्तोत्रा विलास कोरे हिने महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळविले. तसेच इयत्ता चौथीची विद्यार्थिनी गार्गी विनोद बार्‍हे हिनेही शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी करत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला.

या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल शाळेसह परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामागे शाळेच्या प्राचार्या भारती महाजन तसेच शिक्षिका मिनल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालक आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments