मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा मोर्चा वतीने वृक्षारोपण उपक्रम उत्...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा मोर्चा वतीने वृक्षारोपण उपक्रम उत्साहात
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोताळा: महाराष्ट्राचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, मोताळा तालुक्याच्या वतीने वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
हा उपक्रम भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा. विजयराज शिंदे यांच्या तसेच भाजपा युवा मोर्चा बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. संतोषजी काळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.यावेळी भाजपा मोताळा मंडळ अध्यक्ष सचिन शेळके, भाजयुमो मंडळ अध्यक्ष दत्ता पाटील, भाजपा सरचिटणीस नारायण देशमुख, भाजपा मंडळ उपाध्यक्ष विजय पंडित, युवामोर्चा उपाध्यक्ष अक्षयदीप पाटील, प्रल्हाद राऊत, सुभाष मोरे, गोपाल जवरे, ओम पाटील तसेच भाजपा व भाजपा युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम हे काळाची गरज असून, भविष्यातही अशा जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले."एक झाड – भविष्यासाठी एक मजबूत पाऊल." या संदेशासह संपन्न झालेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

No comments