adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक विद्यालय, अडावद येथे स्व. अजितदादांना जयंतीनिमित्त अभिवादन

सार्वजनिक विद्यालय, अडावद येथे स्व. अजितदादांना जयंतीनिमित्त अभिवादन  अडावद (ता. चोपडा) येथील सार्वजनिक विद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यम...

सार्वजनिक विद्यालय, अडावद येथे स्व. अजितदादांना जयंतीनिमित्त अभिवादन 


अडावद (ता. चोपडा) येथील सार्वजनिक विद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना मुख्याध्यापक ए. जे. कदम, पर्यवेक्षक एम. जी. पाटील, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.

अडावद प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)


अडावद येथील सार्वजनिक विद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. जे. कदम यांच्या हस्ते स्व. अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पर्यवेक्षक एम. जी. पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.

यावेळी उपशिक्षक जीवन शिसोदे यांनी स्व. अजितदादांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि जनहिताच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपल्या अभिवादनपर भाषणातून त्यांनी स्व. अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले व त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या स्व. अजितदादांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

No comments