adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या कार्याचा गौरव

 डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या कार्याचा गौरव   प्रतिनिधी मुबारक तड...

 डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा

फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या कार्याचा गौरव  


प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीणकुमार गेडाम यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, फैजपूर येथे कार्यालयीन कामकाजाचा घेतला आढावा घेतला 

या दरम्यान विभागीय आयुक्त यांनी फैजपूर उपविभागीय कार्यालयात भेट देऊन कार्यालयीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विविध शाखांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सुरू असलेल्या प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. आयुक्तांकडून आढाव्या दरम्यान पुढील बाबींची पाहणी केली 


यामध्ये ई ऑफिस प्रणालीद्वारे होत असलेल्या कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली 

• BPMS प्रणालीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला 

• महाऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणालीद्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती अवगत करून घेण्यात आली 

• E-QJ Court प्रणालीद्वारे सुरू असलेल्या न्यायालयीन कामकाजाची पाहणी.

• कार्यालयीन कार्यपद्धती अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या 

यात महत्त्वाचे निर्देश

• सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार व प्रशासकीय कामकाज E-Office प्रणालीद्वारेच करण्यात यावे, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

• डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

फैजपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात ईऑफिस डिजिटल प्रशासन नागरिक सेवा सुशासन या स्तुतीपर कार्याचा  कौतुकास्पद कामगिरी करत असल्याने फैजपूर उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी बबनराव काकडे सह कार्यालयीन कर्मचारी जिल्हा प्रशासनाचा गौरव यावेळी केला 

नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीणकुमार गेडाम जिल्हाधिकारी रोहन घुगे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या सह प्रांताधिकारी बबनराव काकडे,यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर रावेर तहसीलदार दिपा जेधे नायब तहसीलदार जगदीश गुरव, संजय तायडे आदी उपस्थित होते

No comments