adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नाशिक येथे रिमझिम काव्य संमेलन व अहिराणी साहित्यिक सन्मान सोहळा दिमाखात संपन्न विखरण ता शिरपूचे भिमराव पवार यांची कविता सादर

 नाशिक येथे रिमझिम काव्य संमेलन व अहिराणी साहित्यिक सन्मान सोहळा दिमाखात संपन्न   विखरण ता शिरपूचे भिमराव पवार यांची कविता नाशिक प्रतिनिधी (...

 नाशिक येथे रिमझिम काव्य संमेलन व अहिराणी साहित्यिक सन्मान सोहळा दिमाखात संपन्न 

 विखरण ता शिरपूचे भिमराव पवार यांची कविता



नाशिक प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नाशिक येथे पार पडलेल्या  उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद यांच्या वतीने आयोजित महाकवी कालिदास स्मृती प्रित्यर्थ "रिमझिम काव्य संमेलन व अहिराणी साहित्यिक सन्मान सोहळा " नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोड वरिल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य विकास पाटील व कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या हस्ते झाले. प्रारंभी प्रा. प्रकाश माळी व प्राचार्य विकास पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. 


या वेळी विखरण तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथिल भिमराव खंडु पवार यांनी दुष्काळसदृष्य परिस्थिती व  शेतकरि दुखः व्यथा समस्या या विषय आशय संकल्पेवर आधारित

आपली स्वरचित कविता   " भाऊसव्होन याना पुढे आमना मायबापना कडे चांगली ध्यान दिशात ना ? "  ह्या शिर्शकाखालील कविता सादर केली.

या वेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ (कापडणे, जि. धुळे) 



यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी ' महाराजा सयाजीराव गायकवाड भाषा संवर्धक पुरस्कार ' प्राचार्य विकास पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच ' डॉ. दा. गो. बोरसे पुरस्कार ' अहिराणी साहित्यिक बापूराव देसाई (नाशिक), ज्ञानेश्वर भामरे (शिरपूर) आणि अहिराणी रील स्टार कविता पाटील (कासारखेडे) यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थींचा परिचय डॉ. फुला बागुल यांनी करून दिला.

पुरस्कार निवड समितीत प्रा. फुला बागुल, डॉ. नरेंद्र खैरनार, बापूसाहेब पिंगळे व पी. झेड. कुवर यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन खान्देश मराठा मंडळ, नाशिक यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी एम. के. भामरे व प्रा. प्रकाश माळी यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले, तर प्रमोद कुवर यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.

या रिमझिम काव्य संमेलनात सुमारे ५५ अहिराणी कवींनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण जीवन, निसर्ग आणि मानवी मूल्यांवर आधारित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

No comments