हिंगोणा ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. ४ मध्ये विकासकामांची झेप; सदस्य शांताराम तायडे यांच्या कार्याची नागरिकांकडून दखल यावल (प्रतिनिधी) : (स...
हिंगोणा ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. ४ मध्ये विकासकामांची झेप; सदस्य शांताराम तायडे यांच्या कार्याची नागरिकांकडून दखल
यावल (प्रतिनिधी) :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हिंगोणा ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक ४ मधील दलित वस्तीत ग्रामपंचायत सदस्य शांताराम मांगो तायडे यांनी विविध विकासकामे राबवून परिसराचा कायापालट केल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट तसेच इतर मूलभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली असून त्यामुळे वार्डाचा विकास झाल्याचे नागरिक सांगत आहेत.
विशेष म्हणजे, वार्ड क्रमांक ४ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूपात उद्भवू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. तांत्रिक अडचणींमुळे काहीवेळा पाणीपुरवठ्यात किरकोळ अडथळे निर्माण झाले असले तरी नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
शांताराम मांगो तायडे हे सलग तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे वार्डातील नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाला आहे. वार्डातील विविध विकासकामे, नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क आणि लोकहिताच्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका यामुळे आगामी काळात ग्रामपंचायतीत त्यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वार्ड क्रमांक ४ मध्ये मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी करण्यात आलेल्या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पुढील काळातही विकासाची ही गती कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments