adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धानोरा येथे रोडरोमिओ व टवाळखोरांवर अडावद पोलिसांची धडक कारवाई; तिघांवर कायदेशीर कारवाई

धानोरा येथे रोडरोमिओ व टवाळखोरांवर अडावद पोलिसांची धडक कारवाई; तिघांवर कायदेशीर कारवाई  अडावद प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  महिला ...

धानोरा येथे रोडरोमिओ व टवाळखोरांवर अडावद पोलिसांची धडक कारवाई; तिघांवर कायदेशीर कारवाई 


अडावद प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महिला व मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा गाव परिसरात विशेष गस्त व तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विनाकारण फिरून संशयास्पद हालचाली करणाऱ्या तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तीन टवाळखोरांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. धानोरा परिसरात महिला व मुलींना त्रास देणे, रोडरोमिओगिरी करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी टवाळक्या करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींची चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली. यापुढेही महिला सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या, छेडछाड करणाऱ्या तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अशाच प्रकारची कठोर कारवाई सातत्याने सुरू राहील, असा स्पष्ट इशारा अडावद पोलिसांनी दिला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक (प्रभारी) प्रशांत कंडारे, पोलीस उपनिरीक्षक शरीफ तडवी, सचिन नागरे, जयदीप राजपूत, विशाल तायडे तसेच महिला पोलीस अंमलदार दिव्या मराठे यांनी सहभाग घेतला.

No comments