चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा :- राज्य परिवहन महामंडळाच्या चोपड...
चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संदेश क्षीरसागर यांनी शिरपुर, अमळनेर जळगाव या ठिकाणी कामगीरी केली असुन साडे तीन पुर्वी चोपडा आगार प्रमुख म्हणुन कामकाज पाहीले आहे.हुशार अभ्यासु व सर्व समावेशक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणुन त्यांची ओळख आहे.तर स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात व उत्पन्न वाढीत चोपडा आगाराचे महाराष्ट्रात नावलौकिक असल्याने आगाराचे सातत्य टिकवण्याचे त्यांच्या पुढे आवाहन असणार आहे. दिनांक १८ जुलै रोजी आगार प्रमुख पदाचा पदभार स्विकारला यावेळी कर्मचारी बांधव सर्व संघटना व आस्थापना धारकांकडुन त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.चोपडा आगाराचे नावलौकिक टिकवण्यासाठी व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करून सर्व कर्मचारी बांधवांच्या सहकार्याने प्रवाश्यांना चांगली दर्जेदार व सुरक्षित सेवा देण्याची ग्वाही संदेश क्षीरसागर यांनी पदभार स्विकारताना दिली

No comments