adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आरक्षण उपर्गीकरणाचा मोर्चामध्ये सामील होण्याकरिता वाशिम मधून अकोला कडे निघणार भव्य बाईक रॅली

आरक्षण उपर्गीकरणाचा मोर्चामध्ये सामील होण्याकरिता वाशिम मधून अकोला कडे निघणार भव्य बाईक रॅली वाशिम प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) स्थ...

आरक्षण उपर्गीकरणाचा मोर्चामध्ये सामील होण्याकरिता वाशिम मधून अकोला कडे निघणार भव्य बाईक रॅली


वाशिम प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

स्थानिक वाशिम येथील शहीद पोचीराम कांबळे क्रांती फोर्स वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली दिनांक 7 जुलै 2026 रोजी ठीक सकाळी 8.00 वाजता वाशीम शहर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरुवात होऊन स्वराज्य भवन अकोला येथे या रॅलीचा शेवट होणार आहे .


सविस्तर वृत्त असे की,अकोला येथे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती व समस्त मातंग समाज अकोला यांच्या वतीने दिनांक 7 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्वराज्य भवन येथून अनुसूचित जातीतील उपेक्षित व वंचितांना त्यांचे न्याय हक्क मिळावे याकरिता अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ '' न्याय हक्क महामोर्चा '' चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सामील होण्याकरिता वाशिम वरून समस्त मातंग समाज व विविध मातंग समाज संघटनेच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली वाशिम वरून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अकोला कडे निघणार आहे.तरी या रॅलीमध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व मातंग समाज यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान जगदीश मानवतकर अध्यक्ष शहीद पोचीराम कांबळे क्रांती फोर्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी वाशिम जिल्ह्यातील सर्व मातंग समाज आणि वंचित बहुजन समाज यांनी या बाईक रॅली मध्ये उपस्थित राहावे असे आव्हान शहीद पोचीराम कांबळे क्रांती फोर्स वाशिम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments