adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोणवडी येथे आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिर उत्साहात संपन्न

 लोणवडी येथे आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिर उत्साहात संपन्न  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर: अखिल भारतीय श्र...

 लोणवडी येथे आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिर उत्साहात संपन्न 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणवडी येथे आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात डॉ. अश्विनी गौरकर व डॉ. शैलेंद्र शेळके यांनी नागरिकांची नाडी तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.शिबिरामध्ये हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब,सांधेदुखी,मणक्याचे विकार, मूळव्याध,त्वचारोग, पोटाचे विकार,मानसिक आजार तसेच इतर विविध आजारांची तपासणी करण्यात आली.यासोबतच योग्य आहार, जीवनशैली व आवश्यक उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.शिबिराला लोणवडी गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रुग्णांनी नाडी परीक्षणाचा लाभ घेतला. तसेच आवश्यक औषधेही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आली.यावेळी डॉ.अश्विनी गौरकर व डॉ. शैलेंद्र शेळके यांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांपासून बचाव करण्याचे आवाहन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र,लोणवडी येथील पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments