यावल शहरातही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक उभारावे कृती समितीची मागणी. भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक...
यावल शहरातही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक उभारावे कृती समितीची मागणी.
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, आता तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या यावल शहरातही छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, किनगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबतची निवेदन आमदार अमोल जावळे यांना देण्यात आले आहे
समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये यावल हे तालुक्याचे मुख्यालय असूनही शहरात आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे केवळ स्मरणचिन्ह नसून ते भावी पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल. त्यामुळे यावल शहरातील योग्य व मध्यवर्ती ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार अमोल जावळे यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत विषयावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनाही समितीने निवेदन दिले आहे त्यांनी सुद्धा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे
या प्रसंगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील, पंकज सुधाकर हिवराळे, माजी जिल्हा परिषद सदस्य . आर. जी. पाटील तसेच सांगितम ट्रॅव्हल्सचे संचालक विनोदकुमार पंडितराव पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही स्मारक उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या या मागणीमुळे तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, या ऐतिहासिक उपक्रमाला लवकरच सुरुवात करणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments