adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली फाटा–भास्कर देव पेट्रोल पंप रस्त्याची दुरवस्था; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

अंतुर्ली फाटा–भास्कर देव पेट्रोल पंप रस्त्याची दुरवस्था; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा   किरण धायले अंतुर्ली संपादक हेमकांत गायकवाड  अंतुर्ली  ...

अंतुर्ली फाटा–भास्कर देव पेट्रोल पंप रस्त्याची दुरवस्था; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा 


 किरण धायले अंतुर्ली

संपादक हेमकांत गायकवाड 

अंतुर्ली  ता. मुक्ताईनगर :अंतुर्ली फाटा ते अंतुर्ली गाव आणि भास्कर देव पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या मार्गावर केळी वाहतूक करणारे ट्रक, अवजड वाहने तसेच इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याशिवाय बजरंग चौकातून मध्यप्रदेशातील वारोलीकडे जाणारा मार्ग तसेच अंतुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने दिवसभर वाहतूक सुरू असते. त्यामुळे खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

या गंभीर समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मुक्ताईनगर कार्यालयाला नागरिकांनी अनेक वेळा निवेदने देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

No comments