चोपडा येथे भारतीय बौध्द महासभा मार्फत वर्षावास प्रवचन २०२६ मालिकेचे उद्घाटन संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा येथे दि...
चोपडा येथे भारतीय बौध्द महासभा मार्फत वर्षावास प्रवचन २०२६ मालिकेचे उद्घाटन संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व तालुका शाखाच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षवास प्रवचन मालिकेचे जिल्हाच्या व राज्याच्या नियोजना नुसार उदघाट्न मा.आयु.अशोक राजाराम बाविस्कर (मा.नगरसेवक तथा जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) यांचे हस्ते व आयु.शालिकग्राम व्यंकट करंदीकर (प्रमुख,समता सैनिक दल) यांचे अध्यक्ष तेखाली अशोका बुद्ध विहार भिमनगर, बारीवाडा चोपडा येथे करण्यात आले.
वर्षवास प्रवचन मालिकेचा विषय -- विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध (आषाढ पौर्णिमा) या विषयावर प्रवचनकार आयु.भरत भिमराव शिरसाठ शहर अध्यक्ष,बौद्धाचार्य यांनी धम्म देसना दिली.तसेच प्रा.दिलीप पंडीत सपकाळे यांनी ही मार्गदर्शन केले.उद्घाटक अशोक बाविस्कर,व कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिग्राम व्यंकट करंदीकर यांनी मार्गदर्शन केले.वर्षावास कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुकदेव लक्ष्मण बाविस्कर यांनी केले.
सदर वर्षावास प्रवचन कार्यक्रमास शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ, अशोक बाविस्कर, एस.व्हि.करंदीकर, प्रा.दिलीप सपकाळे, जानकीराम शंकर सपकाळे, संजय पिरा अहिरे, गोपीचंद भालेराव, संजय श्रीपत साळुंखे, छोटू वारडे, अनिल गोरख वाडे, सुनिता समाधान सपकाळे, संगीता भरत शिरसाठ, कल्पना अनिल साळुंखे, उषा अशोक बाविस्कर,सुनंदा थोरात,मंगला पवार,आदी बौद्ध उपासक, उपस्थित होते.शेवटी आभार संजय पिरा अहिरे यांनी केले.

No comments