सावदा पोलिसांची अवैध गोवंश वाहतूकीवर कारवाई. दोन गुरांसह वाहन जप्त आरोपींवर गुन्हा दाखल मुबारक तडवी रावेर संपादक हेमकांत गायकवाड रावे...
सावदा पोलिसांची अवैध गोवंश वाहतूकीवर कारवाई.
दोन गुरांसह वाहन जप्त आरोपींवर गुन्हा दाखल
मुबारक तडवी रावेर
संपादक हेमकांत गायकवाड
रावेर तालुक्यातील सावदा शहरातील वृंदावन मॉल जवळ दि.३० जुलै २०२६ रोजी संकाळी ६ वाजेच्या सुमारास सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ख्वाजा नगर भागात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीर रित्या गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी रंगेहात पकडले या धडक कारवाईत १ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन व वाहनातील ४० हजार रुपये किमतीचे २ गो-हे (गोवंश)असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित वाहन चालकाविरुद्ध विविध कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेली गुरे सुरक्षिततेसाठी गोशाळेत पाठवण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर प्रकारे शहरातील ख्वाजा नगर भागात एका चारचाकी वाहनातून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहितीवरून पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित वाहन चालकासह ताब्यात घेतले. वाहन क्र.(एम.एच.०२ वायऐ २६४४) यांची तपासणी केली असता,त्यात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे कोंबलेले ४० हजार रुपये किमतीचे २ गो-हे आढळून आले.वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे गोवंश वाहतुकीचा कोणताही वैध परवाना,स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहनाची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.या कारवाईनंतर पोहेका.समीर तडवी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जप्त करण्यात आलेली दोन्ही गुरे त्यांच्या योग्य पालन-पोषण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ गोशाळेत रवाना करण्यात आली आहेत.तरी या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्याचे पो. कॉ.बबन दगडू तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक शेख तनवीर शेख खलील(वय २७,रा.ख्वाजा नगर,सावदा,ता.रावेर) याच्याविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं. १९४/२०२६ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सन १९७६ (सुधारणा सन २०१५)चे कलम ५(अ),९,प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड), (च)महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम १९८९ चे कलम ८३/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई हि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, मुक्ताईनगर उप विभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि. गणेश पांडुरंग फड, पोहेकॉ.उमेश पाटील, पोहेकॉ.समीर तडवी, पोना.सुनील सैंदाणे, पोकॉ. मयूर पाटील, पोकॉ.बबन तडवी, पोकॉ.राहुल येवले आणि पोकॉ.विकास जोशी यांच्या पथकाने केली आहे. सावदा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.

No comments