adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नागरिकांशी थेट संवाद सपोनि गणेश फड यांचा गांव भेट उपक्रम. गाव भेटीत मोठा वाघोदा वासियांनी केला सत्कार.

 नागरिकांशी थेट संवाद सपोनि गणेश फड यांचा गांव भेट उपक्रम. गाव भेटीत मोठा वाघोदा वासियांनी केला सत्कार. सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक...

 नागरिकांशी थेट संवाद सपोनि गणेश फड यांचा गांव भेट उपक्रम.

गाव भेटीत मोठा वाघोदा वासियांनी केला सत्कार.


सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सावदा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यानी आज मोठा वाघोदा बुद्रुक गावात गाव भेट देऊन उपक्रमाची सुरुवात केली 

भेटी दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अलकाबाई बाळू महाजन,माजी सरपंच कालू मिस्तरी पी एल महाजन, बाळू श्रावण महाजन विजय पाटील, डॉ.गुरुदत्त पाटील राहुल पाटील संजय माळी महेंद्र काळे स्वप्निल पवार, शाकिर मलक उत्तम वाघ आदिंनी नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश फड यांचा सत्कार केला यावेळी या भेटीत मोठा वाघोदा गावातील सर्वसमावेशक प्रतिष्ठीत नागरिकांशी त्यांनी संवाद साधला गावातील सीसीटीव्ही कॅमेरे बाबत माहिती जाणून घेतली 


गावात साजरे केले जाणारे सण उत्सव विविध जाती धर्मियांच्या प्रार्थना स्थळांची माहिती अवगत करून घेतली पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत जतनेची प्रतिक्रिया काय आहे याबाबत ही निरीक्षण केले यासोबतच गुन्हा व गुन्हे गारी पासून आपण सावध कसे रहाल याबद्दल उप‌स्थित नवयुवकांना मार्गदर्शन केले यावेळी एएसआय विनोद पाटील, गोपनीय शाखेचे पो कॉ मयुर पाटील, पोलीस पाटील गणेश भोसले आदिसह गावातील शांतता समितीचे सदस्य ग्रामपंचायत चे पदाधिकारी सदस्य कर्मचारी उपस्थित होते 

No comments