मोठा वाघोदा येथे विशेष पुनर्परीक्षण मोहिमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एसआयआर शिबीर यशस्वीततेकडे! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक...
मोठा वाघोदा येथे विशेष पुनर्परीक्षण मोहिमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एसआयआर शिबीर यशस्वीततेकडे!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एस.आय.आर. विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमांतर्गत मोठा वाघोदा बुद्रुक येथील प्रकाश विद्यालयाच्या सभागृहात तसेच जिल्हा परिषद उर्दु शाळेमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एस.आय.आर. (Special Intensive Revision) विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रमांतर्गत मोठा वाघोदा बुद्रुक येथे मतदारांचे ईएफ (EF) फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. या शिबिराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
शिबिराला खिरोदा मंडळाधिकारी अमोल चौधरी यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत तलाठी मधुराज पाटील कोतवाल मुशिर गुलाब तडवी उपस्थित होते. उपस्थितांनी मतदारांना विशेष पुनर्परीक्षण मोहिमेचे महत्त्व, ईएफ फॉर्म भरण्याची प्रक्रिया तसेच मतदार यादी अद्ययावत ठेवण्याबाबत सबिस्तर मार्गदर्शन केले. यात बीएलओ मकबुल रमजान तडवी सर, अंकुश महाजन सर मेहरबान तडवी सर अमित सिरसाठ नजरुल इस्लाम अब्दूलजलील दोसमोहंमद आदिंचा सहभाग होता


No comments