adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खरवळ सोसायटीतर्फे सभासदांना केसर आंब्याच्या रोपांचे मोफत वाटप

खरवळ सोसायटीतर्फे सभासदांना केसर आंब्याच्या रोपांचे मोफत वाटप प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक : हेमकांत गायकवाड) त्र्यंबकेश्वर :...

खरवळ सोसायटीतर्फे सभासदांना केसर आंब्याच्या रोपांचे मोफत वाटप




प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

त्र्यंबकेश्वर : शेतीला पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळावे आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी या उद्देशाने खरवळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादितच्या वतीने सभासदांना केसर आंब्याच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम संस्थेचे संचालक समाधान बोडके पाटील यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.

या उपक्रमाला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले. केसर आंब्याची लागवड केल्यास भविष्यात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होईल, तसेच ग्रामीण भागातील फळबागांचे क्षेत्र वाढण्यासही हातभार लागणार आहे.

यावेळी समाधान बोडके पाटील यांनी सभासदांना रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून त्यांचे योग्य संगोपन करण्याचे आवाहन केले. भविष्यातही शेतकरी व सभासदांच्या हितासाठी असे विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाबद्दल सभासदांनी समाधान बोडके पाटील यांचे आभार मानून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी संस्थेचे चेअरमन किसन जावळे, व्हाईस चेअरमन ज्योतीताई बोडके, आंबोली सोसायटीचे चेअरमन सुनील मेढे, सरपंच धोंडीराम डगळे, संचालक बुधा ढोरे, भाऊराव राऊतमाळे, गोकुळ ढोरे तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments