adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांच्या संकल्पनेतून इयत्ता ६ वीमध्ये लोकशाहीचा अनोखा अनुभव : वर्गमंत्री व वर्गप्रमुख निवडणूक उत्साहात

उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांच्या संकल्पनेतून इयत्ता ६ वीमध्ये लोकशाहीचा अनोखा अनुभव : वर्गमंत्री व वर्गप्रमुख निवडणूक उत्साहात जळगाव...

उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांच्या संकल्पनेतून इयत्ता ६ वीमध्ये लोकशाहीचा अनोखा अनुभव : वर्गमंत्री व वर्गप्रमुख निवडणूक उत्साहात



जळगाव प्रतिनिधी 


(संपादक : हेमकांत गायकवाड)

मानव सेवा मंडळ, जळगाव संचलित प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि मतदान प्रक्रियेचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने इयत्ता ६ वीच्या वर्गात वर्गमंत्री व वर्गप्रमुख निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


हा नाविन्यपूर्ण उपक्रम उपक्रमशील कलाशिक्षक श्री. सुनिल दाभाडे यांच्या संकल्पनेतून व नियोजनातून राबविण्यात आला. निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी प्रचार केला, मतदार विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतदान केले तसेच मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.



या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माया अंबटकर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व, मतदानाचा अधिकार आणि जबाबदारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच बालवाडी मुख्याध्यापिका सौ. मुक्ता पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया व मानद सचिव श्री. विश्वनाथ जोशी यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होत असल्याचे सांगून कलाशिक्षक श्री. सुनिल दाभाडे यांच्या उपक्रमशील कार्याचे विशेष अभिनंदन केले.



विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या लोकशाहीपर उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, शालेय जीवनात अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments