adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी माजी सैनिकाकडून भोजन व्यवस्था

 पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी माजी सैनिकाकडून भोजन व्यवस्था श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आषाढी वारी निमित्त निवृत्त...

 पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी माजी सैनिकाकडून भोजन व्यवस्था


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आषाढी वारी निमित्त निवृत्ती महाराज पायी दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, पंढरपूरकडे पायी प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांसाठी माजी सैनिक मेजर अशोक पायगुडे यांच्या वतीने भोजन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये शेकडो वारकऱ्यांना प्रेमपूर्वक भोजन वाढून त्यांची सेवा करण्यात आली. यावेळी माजी सैनिकांनी "वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा" या भावनेतून भोजन, पिण्याचे पाणी, आंघोळीची व्यवस्था तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.मेजर अशोक कायगुडे हे गेल्या वीस वर्षांपासून ही  वारकऱ्यांची सेवेचा उपक्रम करत आहेत, समाजसेवा ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असून भविष्यातही अशाच सामाजिक सेवाभावी उपक्रमाचे आयोजन माजी सैनिक कायगुडे यांच्या माध्यमातून सातत्याने होत राहिल. याप्रसंगी मेजर अशोक कायगुडे, सौ, रंजनाबाई कायगुडे , विशेष म्हणजे या भगिनींने एकटीने या सोहळ्याचे भोजन बनवले सोमनाथ कायगुडे, मेजर कृष्णा सरदार, मेजर संग्राम यादव, श्रीराम ट्रेडर्सचे मालक रामचंद्र सुगुर यांनी सेवा केली.

No comments