खिर्डी -विवरा रस्त्यांचे वाजले की बारा! प्रवासात वाहन धारकांची तारेवरची कसरत. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) र...
खिर्डी -विवरा रस्त्यांचे वाजले की बारा! प्रवासात वाहन धारकांची तारेवरची कसरत.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील खिर्डी ते विवरा दरम्यान च्या ५किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून अतिशय बिकट व दयनीय अवस्था झाली आहे, विवरे ते खिर्डी या ५ कि मी अंतरावरचा रस्ता गेल्या काही वर्षां पुर्वि डांबरीकरण करण्यात आला होता मात्र पहिल्याच पावसाच्या पाण्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण चे बारा बाजले असून रस्त्याची पुरतीच वाट लागली आहे व आज तीच परिस्थीती आहे, हा रस्ता शेतकरी बांधवासाठी अधिकच सोयसकर मानला जात असुन सदरील रस्त्यांनी केळी व इतर पिकांचे भरलेले वाहान जात असताना वाहनधारकांना चालकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे, मजुरवर्ग ही या रस्त्यांवनी ये जा करीत असताना या रस्त्यांवरचारचाकी दुचाकी सोडाच पण पायी चालणेही जिकरीचे झाले आहे रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहे, ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची दुरवस्था मोठया प्रमाणावर झालीय रस्ता खराब झाल्याने या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे या कडे संबंधित लोकप्रतिनिधि व अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष देऊन सदरील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी वजा अपेक्षा नागरिकांसह वाहानधाराकाकडुन केली जात आहे,

No comments