adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल-फैजपूर मार्गावर आयशर पलटी; शेतमजुरीसाठी निघालेल्या १९ आदिवासी मजुरांना दुखापत हिंगोणा–सांगवी दरम्यान अपघात; जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार

  यावल-फैजपूर मार्गावर आयशर पलटी; शेतमजुरीसाठी निघालेल्या १९ आदिवासी मजुरांना दुखापत हिंगोणा–सांगवी दरम्यान अपघात; जखमींवर यावल ग्रामीण रुग्...

 यावल-फैजपूर मार्गावर आयशर पलटी; शेतमजुरीसाठी निघालेल्या १९ आदिवासी मजुरांना दुखापत

हिंगोणा–सांगवी दरम्यान अपघात; जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : यावल-फैजपूर मार्गावरील हिंगोणा–सांगवी दरम्यान आज, दि. ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास शेतमजुरांना घेऊन जाणारे आयशर वाहन पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात सातपुडा पर्वतरांगातील कुंड्या पाणी येथून न्हावी परिसरात शेतमजुरीसाठी निघालेले एकूण १९ आदिवासी महिला व पुरुष शेतमजूर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंड्या पाणी येथील शेतमजूर आयशर वाहनातून न्हावी येथे शेतातील कामासाठी जात असताना हिंगोणा–सांगवी दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्यावर पलटी झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात शितल लाधर पावरा (१४), भुरी सुलाराम पावरा (१२), मीना सुभाष पावरा (२४), मेहंदीबाई लालधर पावरा (३०), मिहमा सुनील पावरा (१२), विरालाल सुरमत पावरा (२६), खेना रवींद्र पावरा (१५), दिवती सुनील पावरा (१४), जगन सुरमल पावरा (१३), मंगला सखाराम पावरा, अनिता बाजू पावरा (१७), शहनाज शकील तडवी (२८), सुनिता भिकाराम पावरा (१५), आसिफ सुभेदार तडवी (२४), विराज दगडू पावरा (२१), गिज सागर पावरा (१५), राधा सखाराम पावरा, नसदिम सुभेदार तडवी (२७) आणि बाली तुकाराम पावरा (३०) हे जखमी झाले असून सर्वजण कुंड्या पाणी येथील रहिवासी आहेत.

जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. तुषार सोनवणे, डॉ. प्रज्वल तसेच परिचारिका लीना राणे, सी. कोल्हे आणि ए. एम. ठोके यांनी तातडीने उपचार सुरू केले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेमुळे यावल-फैजपूर मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments