adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे ई स्कूलमध्ये निवृत्त एअर व्हाईस मार्शल प्रवीण कुमार यांचे प्रेरणादायी व्याख्यान

 जे ई स्कूलमध्ये निवृत्त एअर व्हाईस मार्शल प्रवीण कुमार यांचे प्रेरणादायी व्याख्यान  प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 जे ई स्कूलमध्ये निवृत्त एअर व्हाईस मार्शल प्रवीण कुमार यांचे प्रेरणादायी व्याख्यान 


प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर: जे ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मुक्ताईनगर येथे आज दि. 6 जुलै 2026 रोजी "प्रेरणादायी व्याख्यान व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून  निवृत्त एअर व्हाईस मार्शल प्रवीण कुमार AVSM व VSM पुरस्कार प्राप्त  तसेच  SKITM इंदूरचे प्राचार्य डॉ. संजय पुरक  हे उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि प्रमुख अतिथींचे स्वागताने झाली. 


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मान्यवरांचा परिचय एस. आर. ठाकूर सर यांनी अतिशय प्रभावी आणि ओजस्वी शैलीत करून दिला. त्यांच्या देशभक्तीपर शेरो-शायरीने संपूर्ण सभागृह भारावून गेले.एअर मार्शल सरांनी भारतीय वायुसेनेत ३६ वर्षे देशसेवा केली असून त्यांना शौर्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती च्या हस्ते दोन वेळा AVSM आणि VSM या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते SKITM इंदूरचे Dean (SW) & CAO तसेच UPSC Expert Member म्हणून कार्यरत आहेत.या प्रसंगी बोलताना 



एअर व्हाईस मार्शल प्रवीण कुमार सर* यांनी विद्यार्थ्यांना NDA, AFCAT, CDS आणि SSB च्या तयारीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी लागतात - शिस्त, जिद्द आणि देशभक्ती. गणवेश फक्त कपडा नाही, ती जबाबदारी आहे. तुमच्या प्रत्येक स्वप्नामागे कुटुंब आणि देशाचा अभिमान आहे हे विसरू नका. अपयश आले तरी थांबू नका, कारण मंजिल मिलेगी भटक कर ही सही..."सरांनी वायुसेनेतील आपल्या अनुभवांचे किस्से सांगून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि देशप्रेमाची भावना जागृत केली. SSB Interview, Physical Test आणि लेखी परीक्षेच्या टिप्सही त्यांनी दिल्या.*SKITM चे प्राचार्य डॉ. संजय पुरकर* यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे महत्त्व आणि स्पर्धा परीक्षांसाठी नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के.आर. कवळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी "जय हिंद" च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

No comments