कर्तृत्ववान महिला पुरस्काराने वैशाली सुरेश अवसरमोल यांचा सन्मान अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर -:- समाजसेवा,...
कर्तृत्ववान महिला पुरस्काराने वैशाली सुरेश अवसरमोल यांचा सन्मान
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर -:- समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल वैशाली अवसरमोल यांना एस.व्ही.पी.सी. फाउंडेशन यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या "कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६" ने शेगाव येथे सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाची दखल घेऊन प्रदान करण्यात येतो. वैशाली सुरेश अवसरमोल यांनी सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि जनजागृतीच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैशाली अवसरमोल यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, सहकारी आणि समाजाच्या पाठिंब्याला समर्पित असल्याचे सांगितले. भविष्यातही समाजहिताची कार्ये अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक संस्था, मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती असून समाजातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.


No comments