वारकरी, शेतकरी, दिव्यांगांच्या वतीने तुकाराम मुंडे यांच्या हस्ते विठुरायाची महाआरती करण्याची मागणी खामगाव : पल्लवी पाटील (संपादक -:- हेमकां...
वारकरी, शेतकरी, दिव्यांगांच्या वतीने तुकाराम मुंडे यांच्या हस्ते विठुरायाची महाआरती करण्याची मागणी
खामगाव : पल्लवी पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठुरायाची महाआरती महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तुकाराम मुंडे यांच्या हस्ते करण्यात यावी, अशी मागणी खामगाव तालुक्यातील वारकरी, शेतकरी, दिव्यांग तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी, खामगाव यांच्यामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पंढरपूरची आषाढी एकादशी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक आहे. विठोबा हा वारकरी, शेतकरी, कष्टकरी तसेच सर्व जाती-धर्मातील नागरिकांचे श्रद्धास्थान असल्याने या पवित्र सोहळ्याची महाआरती प्रामाणिक व जनहिताची भूमिका जपणारे मंत्री तुकाराम मुंडे यांच्या हस्ते व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, तुकाराम मुंडे हे राज्यातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व निष्कलंक प्रशासकीय कारभारासाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्याच हस्ते विठुरायाची महाआरती करण्याची संधी द्यावी. तसेच त्यांना शासकीय नियमानुसार पूर्ण कार्यकाळ त्याच पदावर काम करण्याची संधी मिळावी आणि त्यांना आमदारकी न देता प्रशासकीय सेवेतच जनहिताचे कार्य करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी काँग्रेस, एमआयएम, CIMC तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, वारकरी, शेतकरी, दिव्यांग प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख उपस्थित
जिल्हा समन्वयक कैसर खान, जिल्हा सरचिटणीस अतुल शिरसाठ, तालुकाध्यक्ष तेजसिंग पवार, शहराध्यक्ष किशोर भोळसे, सरचिटणीस स्वप्नील ठाकरे, युवक काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब शिंदे, पांडुरंग मोरिंगे, गफर खान (एमआयएम तालुकाध्यक्ष), निखिल वळवी, गणेश मांढोरे, जगदीप सिंग बिंदू, खलील शेख, मोतीलाल वाघे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
निवेदक :
खामगाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, वारकरी, शेतकरी, दिव्यांग प्रतिनिधी व नागरिक.


No comments