शिरपूर येथे सत्यशोधक विद्यार्थी संघटने तर्फे लोकशाही,समता आणि परिवर्तनाच्या लढ्याला वैचारिक धार देणारे एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर...
शिरपूर येथे सत्यशोधक विद्यार्थी संघटने तर्फे लोकशाही,समता आणि परिवर्तनाच्या लढ्याला वैचारिक धार देणारे एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न...
धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग ( अधिकृत पत्रकार )
मो.8999838651
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धुळे - शिरपूर येथील सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला वैचारिक दिशा, संघटनात्मक बळ आणि संघर्षशील कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याच्या उद्देशाने सत्यशोधक विद्यार्थी संघटना,शिरपूर तालुका यांच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, बौद्धवाडा (शिरपूर) येथे आयोजित एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
तसेच शिबिराच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून आयुष्यमती कमल युवराज ठोंबरे (उपाध्यक्ष,तालुका खादी ग्रामोद्योग मंडळ,शिरपूर) हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲड.युवराज ठोंबरे(सदस्य, अनुसूचित जाती-जमाती केंद्र पुरस्कृत समिती महाराष्ट्र राज्य),कॉ.दत्ता थोरात (उपाध्यक्ष,सत्यशोधक जनआंदोलन महाराष्ट्र), सिद्धांत बागुल (राज्याध्यक्ष, सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र),केतन निकम (जिल्हाध्यक्ष,धुळे), बापुसाहेब इंदासे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक),डॉ.नितीन निकम(उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर),संध्या जगदेव,रोहिणी जगदेव,कल्पना ईशी,सोनाली मराठे,जे. डी. धिवरे,मनोहर ईशी,गौतम महिरे,मिलिंद निकम,निलिमा भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात ही क्रांतीगीतांनी झाली."राष्ट्रपिता तुम्ही खरे होते जोतिबा"आणि "आम्ही समतेची पाखरं,मारू अन्यायाला ठोकर"या गीतांनी सभागृहात परिवर्तनाचा आणि संघर्षाचा स्वर घुमविला.शाहीर श्वेता गवळे, शाहीर क्रांती पानपाटील यांच्यासह शाहीर प्रवीण पानपाटील,शाहीर विजय अहिरे,शाहीर आनंद महाराज,मयुरी जाधव, अनिल खैरनार व राज पगारे यांनी गीतांद्वारे प्रेरणादायी वातावरण निर्माण केले.
तसेच उद्घाटनपर भाषणात ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲड.युवराज ठोंबरे म्हणाले,"एकेकाळी एका हाकेला हजारो कार्यकर्ते उभे राहत होते; आज हजारो हाका मारूनही मोजकेच पुढे येतात.अशा भयावह काळात लोकशाहीवादी आणि परिवर्तनवादी चळवळींना अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे." त्यासोबतच
बापुसाहेब इंदासे यांनी समाजाभिमुख जीवन आणि वैचारिक निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. व मनोहर ईशी यांनी"शिका आणि कमवा" या विचारातून सामाजिक योगदानाची प्रेरणा दिली. गौतम महिरे यांनी फुले-आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद यांच्या समन्वयातून शोषणमुक्त समाजव्यवस्थेचे स्वप्न स्पष्ट केले.समारोपप्रसंगी डॉ. नितीन निकम यांनी,"संघर्ष, शिस्त,वैचारिक स्पष्टता आणि वेळ देणारा कार्यकर्ता परिवर्तन घडविण्याची क्षमता ठेवतो,"असे प्रतिपादन केले.
पहिल्या सत्रात हेमंत धिवरे यांनी "आयुष्य नावाचा विषय शाळेत शिकवला जात नाही; तो चळवळीच्या विद्यापीठात शिकावा लागतो,"असे सांगत सामाजिक बांधिलकी,त्याग आणि वैचारिक जडणघडणीवर मार्गदर्शन केले. राज्याध्यक्ष सिद्धांत बागुल यांनी जात, वर्ग, स्त्रीमुक्ती,शिष्यवृत्ती,ओबीसी आरक्षण,विद्यापीठ आंदोलन आणि विद्यार्थी हक्कांच्या लढ्यात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची भूमिका अधोरेखित केली.दुसऱ्या सत्रात प्रा.प्रज्ञावंत बिऱ्हाडे यांनी २४ सप्टेंबर शाक्त राज्याभिषेक-जातीअंतक प्रबोधन दिन,२८ नोव्हेंबर शिक्षक दिन,२५ डिसेंबर ,'मनुस्मृती दहन दिन'-'भारतीय स्त्रीमुक्ती दिन', गुरुपौर्णिमा-शहीद एकलव्य दिन आदी सांस्कृतिक प्रबोधन चळवळींची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली.यानंतर झालेल्या गटचर्चेत अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण,नीट-जेईई प्रश्नपत्रिका फुटी व विद्यार्थी आत्महत्या,लोकशाहीचे आधारस्तंभ आणि गोदी मीडिया, वाढती महागाई व बेरोजगारी,जिल्हा परिषद शाळांची पडझड आणि शिक्षणाचे वाढते खाजगीकरण या विषयांवर सखोल चर्चा झाली.
गटचर्चेचा निष्कर्ष मांडताना ज्वाला मोरे यांनी सांगितले की, "सामाजिक-आर्थिक आकडेवारीशिवाय अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखा आहे. शिक्षणाचे वाढते खाजगीकरण,लोकशाही संस्थांची होत असलेली गळचेपी आणि सामाजिक न्यायावरील वाढते संकट याविरोधात संघटित, वैचारिक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष उभारणे ही काळाची गरज आहे."
शिबिरात तालुका कार्यकारिणीची देखील घोषणा करण्यात आली.
याप्रमाणे विशाल लवा शिरसाठ यांची तालुकाध्यक्ष, अनिल संजय अहिरे यांची उपाध्यक्ष, जयवंत प्रकाश थोरात यांची सचिव, विकास साहेबराव साबळे व हेमराज भास्कर सोनवणे यांची संघटक, तसेच अविनाश विजय कापुरे व दीपक प्रकाश सामुद्रे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व प्रशस्तीपत्रांचे वितरण कॉ. दत्ता थोरात, सिद्धांत बागुल, केतन निकम, डॉ. नितीन निकम, रोहिणी जगदेव आणि मिलिंद निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी करण्यासाठीचे साह्य प्राचार्य डॉ. राजू पवार,पनिराज बैसाणे, नितीन मंगळे,देवानंद थोरात, सतीश खैरनार, राहुल थोरात, प्रेमराज निकम, बाळा पवार, रावसाहेब अहिरे, गौतम अहिरे, भैय्या अहिरे,किरण अहिरे, प्रवीण आगळे, सुनील थोरात, सुनील सोनवणे, दीपक खैरनार, कबीर थोरात, विनोद आगळे, रोहित सुरवाडे, सुकदेव बहारे, विनोद ढिवरे, सौरव मोरे आणि साकेत थोरात यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्वाला मोरे यांनी केले.
"संघर्षाशिवाय परिवर्तन नाही, विचाराशिवाय संघर्ष नाही आणि संघटनाशिवाय सामाजिक क्रांती शक्य नाही," हा संदेश देत शिबिराचा समारोप क्रांतीगीतांच्या सामूहिक सादरीकरणाने झाला.

No comments